Latest

परभणी : बॅनरवरील फोटोवरून तरुणाचा खून : ११ जणांवर गुन्हा दाखल

अविनाश सुतार

मानवत: पुढारी वृत्तसेवा : बॅनरवर फोटो लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील एका २१ वर्षीय तरुणाचा तलवारीने वार करून निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी (दि.७) रात्री ९ च्या सुमारास बायपास रोडवर उड्डाण पुलाजवळ घडली. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. बलरामसिंग जोहरसिंग बावरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने शहरातील काही शिकलकरी तरुणांच्या वतीने बॅनर लावणे सुरू होते. शहरातील आठवडी बाजारात लावलेल्या बॅनरवरील फोटोवरून शिकलकरी समाजाच्या काही युवकांनी शहरातील उड्डाण पुलाजवळील रस्त्यावर लाठ्या काठ्या व तलवारीने रात्री ९ च्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात तरुण ठार झाला.

याप्रकरणी रविसिंग गब्बूसिंग बावरी (रा. एकतानगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार 1) सुरजितसिंग सुलतानसिंग टाक (रा. आठवडी बाजार, मानवत), 2) अर्जुनसिंग अरजितसिंग टाक (रा. पाथरी नाका, मानवत), 3)बलवानसिंग सुलतानसिंग टाक (रा. आठवडी बाजार, मानवत), 4)मनजीतसिंग मायासिंग टाक (रा.मानवत), 5) अनंदसिंग कन्हैयासिंग टाक (रा.बिहारी कॉलनी, मानवत), 6) सुलतानसिंग कन्हैयासिंग टाक (रा. मानवत), 7) रणबिरसिंग कन्हैयासिंग टाक (रा. पाथरी नाका, मानवत), 8) शेरसिंग कन्हैयासिंग टाक (रा. बिहारी कॉलनी, मानवत), 9) जुगनूसिंग कन्हैयासिंग टाक (रा. मानवत), 10) सरजीतसिंग कन्हैयासिंग टाक (रा. बिहारी कॉलनी), 11) ललकारसिंग पुनमसिंग जुन्नी (रा. आठवडी बाजार, मानवत) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या खून प्रकरणी पोलिसांनी ललकारसिंग जुन्नी, सुलतानसिंग टाक व अर्जुनसिंग टाक या तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT