Latest

Dean Elgar : कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू भुषवणार द. आफ्रिकेचे कर्णधारपद

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यत कर्णधार टेंबा बवुमाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. दुखापतीमुळे तो पहिल्या आणि दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करू शकला नव्हता. यासह तो फलंदाजीलाही आला नव्हता. (Dean Elgar)

नियमित कर्णधार बवुमाच्या अनुरपस्थितिथ दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी भारतीय संघावर विजय मिळवला. भारताविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात टेंबाच्या अनुपस्थितीत डीन एल्गर कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी हा एल्गरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरणार आहे. भारताविरूद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी एल्गरने याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. मालिकेतील दुसरा सामना केपटाऊन येथे खेळवण्यात येणार आहेत. (Dean Elgar)

पहिल्या कसोटीत टेंम्बाच्या अनुपस्थितीत एल्गरने संघाचे नेतृत्व केले होते. टेम्बा बवुमा द. आफ्रिकेचा कर्णधार होण्यापूर्वी एल्गर हा कसोटी कर्णधार होता. परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे बवुमाला कर्णधार बनवण्यात आले. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत क्षेत्ररक्षण करताना बवुमाला दुखापत झाली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT