Latest

दाऊदचा हस्तक अजीम भाऊ उर्फ ​​मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक

backup backup

कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद ईब्राहीम टोळीचा डोंगरीतील ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डी गॅंगविरोधातील कारवाई सुरुच ठेवली आहे. एनसीबीने दाऊदचा हस्तक अजीम भाऊ उर्फ ​​मोहम्मद अजीम अबू सलीमला अटक केली. त्याच्या विरोधात खंडणी, दरोडे आणि ड्रग्ज तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.

एनसीबीने दाऊदचा हस्तक अजीम भाऊला अटक करण्यापूर्वी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात डी गॅंगचे मुंबईतील ड्रग्ज सिंडिकेट उध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी डोेंगरीतील ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये एनसीबीने माफिया डॉन करीम लाला याचा नातू आणि मुंबईतील ड्रग्ज डीलर परवेझ खान उर्फ चिंकू पठाण याला गजाआड केले होते. त्यानंतर एनसीबीने डी गॅंगच्या ड्रग्ज रॅकेटवर कारवाई सुरुच ठेवत काश्मीरमधून ड्रग्ज तस्करीच्या सहभागातून दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ताब्यात घेत चौकशी केली होती.

SCROLL FOR NEXT