पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपट 'दसरा'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच समीक्षकांकडूनही वाहवा मिळत आहे. या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला चार दिवसांचा वीकेंड मिळाला. त्यानंतर या चित्रपटाने मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत वाढच आहे. (Dasara movie)
दसरा अभिनेता नानी याचा १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. तेलंगणा राज्यातील गोदावरी खाणीजवळील सिंगरेनी कोळसा खाणीमध्ये काम करणा-या तरुणाची भूमिका त्याने साकारली आहे. त्याने यापूर्वी 'हिट', 'जर्सी', 'मख्खी', 'पैसा' यांसारख्या चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दसरा चित्रपटाने अमेरिकेत 2 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. चित्रपटाचे निर्माते सुधाकर चेरुकुरी यांनी दसऱ्याच्या या यशासाठी करीमनगर येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीकंद ओडेला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील प्रत्येक सदस्याला १० ग्रॅमचे सोन्याचे नाणेही दिले आहे.
'दसऱ्या'चे बजेट सुमारे ६५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात नानीसोबत कीर्ती सुरेशही आहे. ३० मार्च प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट कन्नड व्यतिरिक्त, हिंदी, मल्याळम, तेलगू, तमिळ अशा ६ भाषांमध्येही रिलीज झाला आहे. या चित्रपटात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, जे एका गावात राहतात आणि या गावात कोळसा खाणीत काम करतात.
हेही वाचा