Latest

Tej Cyclone : अरबी समुद्रात आज ‘तेज’ चक्रीवादळ?

Arun Patil

पुणे, पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात शुक्रवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आगामी 24 तासांत 'तेज' नावाच्या चक्रीवादळाची (Tej Cyclone) निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचे 21 ऑक्टोबर रोजी महाचक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीकडे जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नैर्ऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्याप्रमाणे शुक्रवारी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. शनिवारी त्याचे चक्रीवादळात व रविवारी (22 रोजी) महाचक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हे वादळ अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकत गुजरात किनारपट्टीकडे धडकण्याची शक्यता आहे. 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान समुद्र खवळणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Tej Cyclone)

हेही वाचा

SCROLL FOR NEXT