Latest

महत्त्वाची बातमी ! अरबी समुद्रात चक्रीय स्थिती ; राज्यात या ठिकाणी असेल पाऊस

अमृता चौगुले

पुणे : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.
अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाली. तसेच केरळ व तमिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे. सध्या केरळ किनारपट्टीपासून ते दक्षिणपूर्व अरबी समुद्रात खालच्या व मध्यम भागात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT