PuranPoli Prasad For Lakshmi Puja : लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी झटपट लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याच्या टिप्स | पुढारी

PuranPoli Prasad For Lakshmi Puja : लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी झटपट लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याच्या टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीतील खास दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. (PuranPoli Prasad For Lakshmi Puja ) एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. (PuranPoli Prasad For Lakshmi Puja)

लक्ष्मीपूजन दिवशी महिलांची खूपच धावपळ होते. पुरण पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबत ते बवनण्यापर्यंत महिलांचा कस लागतो. पुजेला लागणाऱ्या लुसलुशीत पुरणपोळ्या कशा बनवाव्यात, यासाठी काही सोप्या टिप्स पुढीलप्रमाणे – 

१. पुरणाच्या पोळीची कणिक मळताना पाण्यात विरघळलेली एक चमचा साखर मिक्स करून घ्यावी. यामुळे पीठाला मऊपणा येतो आणि कणकेतून पुरण बाहेर पडत नाही. कणकेला चिकटपणा येतो.

२. एका मोठ्या भांड्यामध्ये तेल लावून कणिक मळून ठेवावे. नंतर खलबत्याच्या बत्याने तार सुटेपर्यंत कणीक चेचून घ्यावे.

३. कणिक मळताना दोन चमचे गरम तेलाचा वापर करावा, यामुळे कणकेला मऊपणा येतो.

४. पुरण पोळी करताना सुरूवातील २ तास हरभरे डाळ चांगली मऊ होईपर्यंत भिजवावी.

५. पुरणात गुळ घालताना बारीक काप करून किंवा किसणीने किसून घालावे.

६. पुरणात गूळ समप्रमाणातच घालावा. कारण, जास्त गुळ घातल्यास पुरण कडक होते. कमी गुळ घातल्यास पोळ्या कमी गोड होतात.

७. सुंट, जायफळ, वेलदोडे या पदार्थ पुरणात घालावे. यामुळे पुरण पोळी खाल्यानंतर पोट जड वाटणार नाही.

८. मिक्सर किंवा पुरण वाटण्याच्या किसणीने पुरण वाटल्यास पुरणपोळ्या फाटत नाहीत.

९. हरभरे डाळ भिजवताना भांड्यात खाली एक चमचा तुप किंवा तेल घालावे. त्यामुळे डाळ एकमेकांना चिकटणार नाही.

१०. डाळीत गुळ घातल्यानंतर पातळ झाल्यास हे मिश्रण सुती कपड्याने पिळून घ्यावे.

११. पुरणात गुळासोबत साखर घातल्यास चालते. मात्र, गॅसवर हे मिश्रण ठेवल्यावर जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही यांची काळजी घ्यावी.

१२. गॅसवरील तव्यावर पोळी किंवा पुरण लागून करपू नये म्हणून सारखे- सारखे पोळी परतत राहावे

१३. पोळी करताना पुरण जास्त घट्ट झाल्यास त्यावर थोडा दुधाचा वापर केला तरी चालतो.

१४. पुरण पोळी लाटताना त्यातून पुरण बाहेर येवू नये म्हणून काळजी घ्यावी.

Back to top button