Latest

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेलांना ‘सेक्सटॉर्शन’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडिओ कॉल ( Sextortion Call ) करुन खंडणी उकळण्याचे प्रकार अलिकडील काळात वाढीस लागलेले आहेत. मात्र चक्क एका केंद्रीय मंत्र्यालाच अशा प्रकारचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब या दोन आरोपींना अटक केली आहे.

Sextortion Call : ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना 'सेक्सटॉर्शन कॉल' मध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. अश्लील कॉल आल्यानंतर पटेल यांच्या स्वीय सहायकाने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करीत तपास केला व दोघ आरोपीना अटक केली.

पटेल यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला होता. हा कॉल घेताच दुसरीकडून आक्षेपार्ह अश्लील व्हिडीओ सुरु झाले. पटेल यांनी तातडीने हा कॉल बंद केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. दोन्ही आरोपींना राजस्थानमधील उदयपूरमधून ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी साबीर हा फरारी असून त्याचा शोध सुरु आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT