Coal Scam | कोळसा घोटाळा प्रकरणी विजय आणि देवेंद्र दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा | पुढारी

Coal Scam | कोळसा घोटाळा प्रकरणी विजय आणि देवेंद्र दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांचे पुत्र मुलगा देवेंद्र दर्डा, M/S JLD यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा विभाग सचिव एच. सी. गुप्ता, दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी के. एस. क्रोफा आणि के.सी. सामरिया यांना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Coal Scam)

छत्तीसगडमधील कोळसा घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र यांच्यासह इतर आरोपींवरील आरोप याआधीच निश्चित झालेले आहेत. तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता.

दोषींना जास्तीत जास्त शिक्षा दिली जावी, अशी विनंती सीबीआयकडून करण्यात आली तर प्रकृतीचे कारण देत कमी शिक्षा दिली जावी, असा युक्तिवाद दोषींकडून करण्यात आला. सर्व दोषी विरोधात ठोस पुरावे आहेत. अशा स्थितीत कमी शिक्षेसाठी प्रकृतीचे कारण योग्य असू शकत नाही, असे यावर सीबीआयकडून सांगण्यात आले. या प्रकरणी न्यायालयात ९ वर्षे सुनावणी चालली होती. (Coal Scam)

हे ही वाचा :

 

Back to top button