Latest

Cyber Commandos : आता ‘सायबर कमांडोज’ रोखणार सायबर गुन्हे

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मागील काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Commandos) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय गृह मंत्रालय मोठे पाऊल उचलणार आहे. भारत सरकारने सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी 'सायबर कमांडोज'ची एक शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विंगमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील तसेच केंद्रीय पोलीस संघटनांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. यासाठी गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील १० योग्य 'सायबर कमांडो'ची निवड करण्यास सांगितले आहे.

Cyber Commandos : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहिले

गृह मंत्रालयाने घेतलेल्या पत्रात म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या डीजीपी, आयजीपी परिषदेत पंतप्रधानांनी सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, एक विशेष सायबर स्पेस आणि पोलिस आणि सरकारी संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन योग्य प्रशिक्षित 'सायबर कमांडोज'ची शाखा स्थापन करावी, अशी शिफारस केली होती. (Cyber Crime)

या प्रस्तावानुसार सायबर कमांडो विंग हा पोलिस संघटनांचा अविभाज्य भाग असेल. त्यात आयटी सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील जाणकार आणि सक्षम कमांडो असतील. प्रस्तावित सायबर कमांडो विंग पोलीस संघटनेचा अविभाज्य भाग असेल. राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय पोलिस संघटना, सीएपीएफकडून घेतलेल्या योग्य प्रशिक्षित आणि सुसज्ज पोलिस कर्मचार्‍यांकडून त्याचे व्यवस्थापन केले जाईल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT