कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कडूस (ता. खेड) येथे गोहत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सद्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २७ जून ते १० जुलैपर्यत जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे.
गोहत्या केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १) कान्हेवाडी बुद्रुक, कडधे, वेताळे, सायगाव, साबुर्डी, कोहिंडे बुद्रुक, शिरोली, कुरकुंडी, पाईट आदी गावातील नागरिकांनी एकत्र येत गाव बंदची हाक दिली आहे.
गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीच्या दिवशी बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या कत्तलखाण्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानीक गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी दिवसाढवळ्या गोहत्येचा प्रकार उघडकिस आला. यात कङूस गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य शाबिर शौकत इनामदार (मुलाणी) व यांचा भाऊ शाकिर शौकत इनामदार (मुलाणी) यांनी गोहत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कडुस येथे हिंदूधर्मिय लोकांच्या भावना दुखावल्या. त्याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीना अटक केली असून तपास चालू आहे. परंतु धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकार आणि ग्रामस्थांचा उद्रेक लक्षात घेत भारतीय दंड सहिता कलम २९५ अंतर्गत वाढीव गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोघांना चार दिवसाची पोलिस कोठडी दिल्याचे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
या घटनेच्या अनुषंगाने सोशल मिडियातून निषेध व्यक्त केला जात आहे. कङूस गावात तणावग्रस्त शांतता असून बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला असून गावाला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. त्यांच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील ग्रामस्थ, तरुण सक्रिय झाले असून सोशल मिडियावर गाव बंदची हाय देऊन बंद पुकारत आहे. या आवाहनाला व्यापाऱ्यासह ग्रामस्थ मोठा उत्सपुर्त प्रतिसाद देत असून कडकडीत बंद पुकारला जात आहे.
रविवारी (दि. २) चासकमान, आखरवाडी, दोंदे, चांदूस किवळे, वाडा आदी गावातील नागरिकांनी गावे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे तर सोमवारी (दि. ३) राजगुरूनगर शहर, जरेवाडी, गुळाणी, वाफगाव, जऊळके, चिचबाईवाडी, गाडकवाडी, वरुडे, पुर, कनेरसर, रेटवडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, निमगाव, मांजरेवाडी, दावडी आदी गावे बंद ठेवण्याचे आवाहन सोशल मिडियाद्वारे करण्यात येत आहेत. गावात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन लक्ष ठेऊन असून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान शिरोली ग्रामपंचायतने खेड पोलिस स्टेशनला पत्र दिले. यामध्ये सबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून वारंवार धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी पोषक कृत्य यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तरी त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा