Latest

CPI-M Remark On ED: ईडीने खटले दाखल केलेल्या २५ नेत्यांपैकी २३ नेते भाजपमध्ये- माकप

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: "ईडीने ज्या २५ नेत्यांविरुद्ध खटले दाखल केले त्यापैकी २३ नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पक्षात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना लोकांना पटवून द्यावे लागत आहे की, त्यांचा पक्ष भारताने पाहिलेला सर्वात भ्रष्ट पक्ष नाही. इलेक्टोरल बॉंड्सच्या माध्यमातुन भाजपला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले. त्यामुळे भाजपचे नाव आता भारतीय बॉंड पक्ष आहे." असे म्हणत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली. (CPI-M Remark On ED)

गेले काही दिवस इलेक्टोरल बॉंड्सच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका होत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनीही याच मुद्दयावरून पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली आहे. वृंदा करात म्हणाल्या की, "मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप सहानुभूती वाटते. ते लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांचा पक्ष भारताने पाहिलेला सर्वात भ्रष्ट पक्ष नाही. देशातील ३३ कंपन्या ज्यांची उलाढाल काही लाखांच्या पलीकडे नाही, ज्या सध्या नुकसानीत आहेत. त्यांनी ५३० कोटी रुपये इलेक्टोरल बॉंड्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांना दिले. त्यापैकी ७५ टक्के पैसे भाजपला दिले." असेही त्या म्हणाल्या. (CPI-M Remark On ED)

देशभरात होत असेलेल्या ईडीच्या कारवायांवरुनही वृंदा करात यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. "ईडीने ज्या २५ नेत्यांविरुद्ध खटले दाखल केले त्यापैकी २३ नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पक्षात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिला होता की, आम्ही भ्रष्टाचार मिटवू' मात्र, आज परिस्थिती अशी आहे की 'आमच्याकडे या आणि केसेस बंद करा," असा घणाघातही त्यांनी केला. (CPI-M Remark On ED)

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT