Latest

COVID19 | देशात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा वाढवली चिंता, २४ तासांत ३,८०५ नवे रुग्ण, २२ मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क

COVID19 : देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,८०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३,१६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात २०,३०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ५ लाख २४ हजार २४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात येत आहे. गुरूवारी दिवसभरात ३ हजार ५४५ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ३ हजार ५४९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती.

आज शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.७८ टक्के नोंदवण्यात आला आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९० कोटी ९४ हजार ९८२ डोस देण्यात आले आहेत. यातील २.९९ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून २ कोटी ९० लाख ८७ हजार ७२ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १८ कोटी ८१ लाख ६५ हजार १९० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४.०३ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ८७ हजार ५४४ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT