पुढारी ऑनलाईन : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांवर कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,१९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ६७,५५६ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.(Covid-19 updates)
याआधीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.२१) देशात ११,६९२ रुग्ण आढळून आले होते. ही दैनंदिन रुग्णसंख्या आठ महिन्यांतील सर्वाधिक आहे. तर ४२ कोरोना जणांच्या मृत्यूची नोंद झाली. देशात आतापर्यंत कोरोनामुळे पाच लाख ३१ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात १० हजार ७६५ रुग्ण बरे झाले आहेत.
गुरुवारी देशात कोरोनामुळे ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यात केरळमधील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर दिल्लीत ६ जणांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी चार मृत्यूंची नोंद आहे. मार्चपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या वर गेला आहे. (Covid-19 updates)
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना गुरुवारी (दि.२०) कोरोनाची लागण झाली असून सध्या ते घरातच विलगीकरणात आहेत. हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत ते भाग घेणार होते, तथापि कोरोना झाल्यामुळे त्यांचे पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राजनाथ सिंह यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली असून पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा