देशात कोरोनाची रुग्‍णसंख्‍या का वाढतेय ? IMA ने सांगितली ‘ही’ तीन कारणे | पुढारी

देशात कोरोनाची रुग्‍णसंख्‍या का वाढतेय ? IMA ने सांगितली 'ही' तीन कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशात पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्‍ये देशात ५ हजार ८८० नवे रुग्‍ण आढळले आहेत. देशात आता सक्रीय रुग्‍णांची संख्‍या ३५ हजार १९९ इतकी झाली आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे केंद्र सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये आले असून आता देशभरातील सर्व सरकारी रुग्‍णालयातील तयारीची पाहणी करण्‍यासाठॅ आज देशव्‍यापी मॉक ड्रिलला सुरुवात झाली आहे. दरम्‍यान, देशात अचानक कोरोना रुग्‍णसंख्‍या कशी काय वाढली या इंडियन मेडिकल असोसिएशन ( IMA) ने तीन कारणे सांगितली आहेत.

कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढण्‍याची ‘ही’ आहेत तीन प्रमुख कारणे

देशात कोरोना रुग्‍णसंख्‍येत अचानक वाढ होण्‍यास IMA ने तीन प्रमुख कारणे सांगितले आहेत. पहिले कारण हे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर ( सोशल डिस्‍टंस ) नियमाचे पालन करण्‍याच बंद झाले आहेत. त्‍याचबरोबर देशभरात कोराना चाचणी संख्‍या कमी झाली आहे. त्‍यामुळे कोरोना बाधित रुग्‍णांकडून याचा फैलाव होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. तर तिसरे प्रमीख कारण म्‍हणजे कोरोना विषाणूचा नवा व्‍हरियंट हे आहे.

काही काळापासून चाचणी दरम्यान कोरोनाचे नवीन प्रकार आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचे हे नवीन रूप पूर्वीच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. INSACOG ने अलीकडेच नोंदवले आहे की भारतातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना संसर्गाच्या 38.2 टक्के प्रकरणांसाठी XBB.1.16 प्रकार जबाबदार आहे.

कोरोनाविरूद्ध चाचपणीसाठी देशभरात मॉक ड्रिल सुरु!

देशात पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्‍ये देशात ५ हजार ८८० नवे रुग्‍ण आढळले आहेत. देशात आता सक्रीय रुग्‍णांची संख्‍या ३५ हजार १९९ इतकी झाली आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे केंद्र सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये आले असून आता देशभरातील सर्व सरकारी रुग्‍णालयातील तयारीची पाहणी करण्‍यासाठॅ आज देशव्‍यापी मॉक ड्रिलला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्‍लीतील राममनोहर लोहिया रुग्‍णालयास भेट दिली. येथे त्‍यांनी रुग्‍णालयातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेची पाहणी केल्‍याचे ‘एएनआय’ने म्‍हटले आहे.

मागील आठवडाभरात देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल ९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची सज्जता तपासून पाहण्याकरिता दिनांक १० व ११ एप्रिल रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button