Latest

COVID-19 Testing : दिल्लीत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली जाणार

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चीनसह काही अन्य आशिया खंडातील देशांमध्‍ये कोरोनाने  आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने दिल्लीतील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (COVID-19 Testing) दरम्यान, कोरोना संकट वाढायच्या आधीच रुग्णालयांमधील तयारी मजबूत केली जात असून, सोमवारी (दि.२६) अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांना भेट देणार आहे.

तयारीचा भाग म्हणून मंगळवारी सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेतले जाणार असल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य सचिव अमित सिंघला यांनी दिली. सिंघला यांनी यादृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक देखील रविवारी सकाळी घेतली. रुग्णालयात खाटांची संख्या पुरेशी ठेवण्यासहित इतर आवश्यक ती तयारी केली जावी, असे निर्देश सिंघला यांनी या बैठकीत दिले. (COVID-19 Testing)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT