Latest

Covid-19 : दिल्लीत लवकरच निर्बंध हटविले जाणार : केजरीवाल

अमृता चौगुले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील कोरोनाचा (Covid-19) संक्रमण दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच महानगरातील निर्बंध हटविले जातील, अशी माहिती दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री (CM) अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली.

सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी दिल्‍ली सरकारचा प्रयत्न

सर्वसामान्यांचे जीवन पूर्वपदावर यावे, त्यांना त्रास होऊ नये, असा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने आवश्यक ते उपाय योजले जात आहेत, असेही केजरीवाल म्हणाले. मागील दहा दिवसांच्या कालावधीत (Covid-19) संक्रमण दर 20 टक्क्याने कमी झाला आहे. 15 जानेवारी रोजी हा दर 30 टक्क्यांपर्यंत वाढला होता. सध्या तो 10 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. कोरोना नियंत्रणात येण्यासाठी वेगाने होत असलेले लसीकरण यासाठी कारणीभूत असल्याचेही केजरीवाल म्हणाले.

दिल्लीतील शाळा पुन्हा होण्याची शक्यता

दरम्यान निर्बंधावर विचारविमर्श करण्यासाठी दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक येत्या गुरुवारी बोलाविण्यात येणार आहे. ही बैठक नायब राज्यपाल अनिल बैजल तसेच केजरीवाल यांच्या उपस्थितीत पार पडेल. तसेच दिल्लीतील शाळा (Schools) पुन्हा सुरु करण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT