दिल्लीत लॉकडाऊन नाही; मात्र गरजेनुसार कठोर निर्बंध

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचे संकट वाढत असले तरी दिल्लीमध्ये सरसकट लॉकडाऊन लावला जाणार नाही, असा निर्णय दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गरजेनुसार आवश्यक ते कठोर निर्बंध मात्र अंमलात आणले जातील, असेही नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीवेळी हॉटेलमध्ये बसून जेवण करण्याची सुविधा रद्द करणे, मेट्रो तसेच बसेसमधील प्रवासी संख्येत कपात करणे आदी पर्यायावर विचार करण्यात आला. विशेष म्हणजे दिल्ली सरकारने याआधीच मेट्रोमधील प्रवासी संख्या 50 टक्क्यांवर आणण्यास विरोध केलेला आहे.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन निर्बंध जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. रविवारी दिल्लीत कोरोना संख्येत 22 हजार 751 ने भर पडली होती. दिल्लीतील संक्रमण दरसुध्दा वाढून 23.53 टक्क्यांवर पोहोचलेला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी डीडीएमएने शनिवारी आणि रविवारी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता.
हेही वाचा
- Rajesh Tope : घरीच क्वारंटाईन असणा-या रुग्णाला होम आयसोलेशन किट देणार : राजेश टोपे
- ‘रंग दे बसंती’मध्ये काम केलेल्या कलाकाराचे सायना नेहवालवर अश्लील ट्विट