Latest

COVID-19 cases update | कोरोना रूग्णसंख्येत किंचितशी घट; गेल्या २४ तासांत १००९३ नवे रुग्ण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली होती. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १००९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद (COVID-19 cases update) करण्यात आली आहे. समोर आलेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसांपेक्षा कोरोना रूग्ण संख्येत किंचितशी घट झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ५७५४२ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सध्याच्या अपडेटनुसार, गेल्या २४ तासांत १००९३ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आज रविवारी (दि.१६) भारतातील कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत किंचितशी घट (COVID-19 cases update) झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) ही रूग्णसंख्या १११०९ इतकी होती. गेल्या २४ तासांत देशात २३ मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा ५३१११४ वर पोहोचला असून, मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्क्यांवर पोहोचले असल्याचे मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.

COVID-19 cases update: महाराष्ट्र्रात 24 तासात दोन रूग्णांचा मृत्यू

केरळमध्ये सर्वाधिक ८१८ कोरोना सक्रिय रूग्णसंख्या असून, येथे गेल्या २४ तासांत एकही मृत्यूची नोंद नाही. महाराष्ट्रात ११९ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर गेल्या २४ तासात २ जणांचा कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्येत वाढ

उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे ५७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हरदोई जिल्ह्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात कोविडच्या सक्रिय संख्येने २ हजारचा टप्पा ओलांडला आहे.

संपूर्ण आशियात कोरोनाची नवीन लाट

अनेक आशियाई देशात कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या नवीन लाटेमुळे आरोग्य सेवा प्रणालींवर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या जवळपास दुप्पट होऊन या वर्षीच्या उच्च पातळीवर पोहोचली, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. इंडोनेशियातही दैनंदिन रुग्णसंख्या चार महिन्यांच्या उच्चांकावर जवळ पोहोचली आहे. व्हिएतनामने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत. सिंगापूरमध्ये मार्चच्या अखेरीस आठवड्याची रुग्णसंख्या १४ हजारांवरून २८ हजारांवर पोहोचली. गेल्या काही महिन्यांत इंडोनेशियातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे गेल्या बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्या ९८७ वर पोहोचली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT