जुना पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्गावर आज जड वाहनांसाठी बंद | पुढारी

जुना पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्गावर आज जड वाहनांसाठी बंद

कार्ला : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. 16) खारघर, नवी मुंबई येथे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 15 ते 20 लाख श्री सदस्य व अनुयायी येणार असल्याने रविवारी जुना पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तसेच, याची जनजागृतीसाठी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने कार्ला फाटा येथे फलक लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्रभूषण पुरस्कार गौरव सोहळ्यासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतून सुमारे 15 ते 20 लाख श्री सदस्य व अनुयायी खासगी वाहनांनी, एसटी बसने तसेच रेल्वेने खारघर, नवी मुंबई येथे येणार आहेत. रविवार सार्वजनिक सुटी असल्याने वाहतूककोंडी टाळण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग, द्रुतगती मार्गावर मार्गावरून अवजड वाहनांस बंदी घालण्यात आली आहे.

रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने खारगर येथे सन्मानित करणार असल्याने तसेच रविवार हा सुटीचा दिवस असल्याने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ शकते. यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने जुना मुंबई-पुणे महामार्ग, द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

                      – किशोर धुमाळ, पोलिस निरिक्षक लोणावळा ग्रामीण

Back to top button