Latest

 Covid 19 | चिंता वाढली : देशात कोरोनाचे ६४० नवे रुग्ण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील काही भागांत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज (दि.२२) देशात ६४० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३,००० च्या जवळ पोहोचली. (Covid 19)

 Covid 19 : सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय

अनेक राज्यांमध्ये सक्रिय कोविड रुग्णांची  वाढ झाली आहे. आज (दि.२२) देशात ६४० नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून केरळमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे, तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३,००० च्या जवळ पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण आढळल्यानंतर रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यासह केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी येथे कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोविड-19 मधून तब्बल ४,४४,७०,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत, कोविड लसीचे २२०.६७ कोटी (२२०,६७,७९,०८१) डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT