Latest

Coronavirus Updates : देशभरात १ हजार ९३८ कोरोनाग्रस्तांची भर, ६७ रुग्‍णांचा मृत्‍यू

नंदू लटके

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या एका दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंद झाली.बुधवारी दिवसभरात १ हजार ९३८ नवे कोरोना रुग्‍ण आढळले. ( Coronavirus Updates ) एक दिवसापूर्वी मंगळवारी देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५८१ नोंदवण्यात आली होती. मागील २४ तासांमध्‍ये ६७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. २ हजार ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५% आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२९ टक्के नोंदवण्यात आला आहे.

Coronavirus Updates : १२ ते १४ वयोगटातील बालकांना आतापर्यंत ७२ लाख डोस

देशात आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ७५ हजार ५८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार ४२७ पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत ५ लाख १६ हजार ६७२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८२ कोटी २३ लाख ३० हजार ३५६ डोस लावण्यात आले आहेत.१२ ते १४ वयोगटातील बालकांना आतापर्यंत ७२ लाख डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८४ कोटी ७ लाख ५७ हजार ४७५ लशींपैकी १६ कोटी ६८ लाख ६८ हजार २२६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७८ कोटी ४९ लाख ५२ हजार ८०० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील ६ लाख ६१ हजार ९५४ तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती 'आयसीएमआर'कडून देण्यात आली आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT