Latest

Coronavirus In China : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; डिसेंबर महिन्यात २५ कोटीहून अधिक लोक संक्रमित

अमृता चौगुले

बीजिंग; पुढारी ऑनलाईन : चीन, अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. चीनमध्ये तर परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. चीनमध्ये फक्त डिसेंबर महिन्यात २० दिवसात २५ कोटीहून अधिक लोक कोरोनाने बाधित झाले आहेत. (Coronavirus In China)

बीजिंगमध्ये कोरोनाने सर्वोच्च टोक गाठले आहे. तिथे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अशीच परिस्थिती लवकरच शांघायमध्ये निर्माण होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, आरोग्य तज्ज्ञांचा हवाला देत असे म्हटले आहे की, चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगाने पसरत आहे की, आठवडाभरात शांघायमधील परिस्थिती आणखी बिघडू शकते. (Coronavirus In China)

जवळ जवळ हे आता स्पष्ट झाले आहे की, चीनमध्ये कोरानाची त्सुनामीच आली आहे आणि यातून चीनला बाहेर येण्यासाठी अनेक महिने जातील. त्यामुळे चीनचा विचार करता जगाने वेळीच सावध होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Coronavirus In China)

शांघायची परिस्थिती गंभीर (Coronavirus In China)

फुदान विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक झांग वेनहॉन्ग यांच्या मते त्यांना वाटते की शांघायमध्ये संसर्ग शिगेला पोहोचेल आणि कोरोनाचा उद्रेक एक ते दोन महिने टिकेल. बीजिंग आणि सिचुआन प्रांतात जवळपास निम्मी लोकसंख्या कोरोनाने संक्रमित झाली आहे.

एक अहवाला नुसार, टियांजिन नगरपालिका आणि हुबेई, हेनान, हुनान, अनहुई, गान्सू आणि हेबेई प्रांतातील २० ते ५० टक्के लोकांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या महामारी विज्ञानानुसार (epidemiology) बीजिंगसारख्या काही शहरांमध्ये कोरोना आधीच उच्चतम शिखरावर पोहचला आहे. चीनमध्ये आता अनेक ओमिक्रॉनच्या (omicron variant) अनेक प्रकरांचा संसर्ग होत आहे.

कोरोनाबाबत योग्य माहिती न देणे, रुग्णांचे आकडे लपवण्याचे काम चीनने कायम केले आहे. आता ही चीनने तेच केले आहे. सध्या चीनमध्ये इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे की, जिकडे पहाल तिकडे कोरोनाचे रुग्ण दिसत आहेत. रुग्णांलयांची अवस्था इतकी बिकट आहे की, रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली आहे.

चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २३ डिसेंबर रोजी कोरोनामुळे एक सुद्धा मृत्यू झालेला नाही. तर २३ डिसेंबर रोजी ४१२८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर ९९ जणांची स्थिती गंभीर होती. तर २३ डिसेंबरच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी ३७६१ रुग्ण आढळले तर त्यातील ४२ जणांची स्थिती गंभीर होती.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT