Latest

Corn boil : अशी करा मक्याच्या दाण्याची चटपचटीत उसळ 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या पर्यटनस्थळी विशेष करून आपण थंड हवेच्या ठिकाणी भेट दिली, तर खूप सारे पदार्थ आपल्याला गाड्यांवर खायला मिळतात. माथेरान असो की, महाबळेश्वर असो किंवा लोणावळा असो… या ठिकाणी गेल्यानंतर त्या थंड वातावरणात गरमा-गरम मक्याच्या दाण्याची चटपटीत उसळ (Corn boil) खायला पर्यटक प्राधान्य देतात. आज आपण मक्याच्या दाण्याची चटपटीत उसळ, कशी बनवायची हे पाहू…

मक्याच्या दाण्याची उसळ करण्यासाठीचे साहित्य

१) पावकिलो मक्याचे दाणे निघतील, असं कणीस घ्या.

२) मध्यम आकाराचा एक कांदा घ्यावा.

३) दोन वाटी किसलेलं ओलं खोबरे

४) पाच कुडी लसूण

५) दोन हिरव्या मिरच्या

६) दोन मध्यम आकाराचे टोमॅटो, चिंच, आलं.

७) दोन चमचा लाल तिखट, हळद,

८) कोथिंबीर आणि कढीपत्ता, लिंबू

९) तेल, चवीनुसार मीठ

… अशी करा मक्याच्या दाण्याची उसळ

१) पहिल्यांदा एका भांड्यात पाणी आणि मीठ टाकून त्यामध्ये कणीस उकडून घ्या.

२) कणीस उकडल्यानंतर त्याचे दाणे काढून घ्या.

३) ओलं खोबरं, कांदा, मिरच्या, आलं आणि लसूण बारिक करून त्याची मिक्समध्ये तयार करून घ्या.

४) गॅसवर कढई ठेवा, त्यात तेल टाकून गरम करून द्या.

५) नंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता फोडणी द्या.

६) त्यानंतर बारिक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून परतून घ्या.

७) त्यात अर्धा चमचा हळद, दोन चमचे मिरची पावडर घालून मसाला पेस्ट करून घ्या.

८) आणि शेवटी उकडलेले मक्याचे दाणे टाकून घ्या. कढईमध्ये चांगलं हलवून घ्या.

अशा पद्धतीने तुमची खास मक्याच्या दाण्याची चटपटीत उसळ (Corn boil) तयार झाली आहे. ही उसळ एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि खायला सुरुवात करा. जर तुम्हाला मीठ लागत असेल, तर वरूनदेखील मीठ टाकू शकता.

पहा व्हिडीओ  : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी…

या रेसिपीज वाचल्या का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT