Latest

Vir Das : भारताला लव्ह लेटर लिहित राहणार; दोन भारत वादावर कॉमेडियन वीर दासचा खुलासा

backup backup

अलीकडेच वॉशिंग्टनमधील केनेडी सेंटरमध्ये 'टू इंडिया' या एकपात्री नाटकाचे सादरीकरण झाल्यावर स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. नकला करणे हे आमचे काम आहे आणि जोपर्यंत आपण कॉमेडी करण्यास सक्षम आहे तोपर्यंत ते करत राहीन असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. (Vir Das)

गेल्या आठवड्यात यूट्यूबवर पोस्ट केलेल्या त्याच्या व्हिडिओवर अनेकांनी जोरदार टिका केली होती. या वादानंतरच्या आपल्या पहिल्या मुलाखतीत त्याने, कोणत्याही भारतीयाला, ज्याला विनोदाची भावना आहे, त्याला हे माहीत आहे हे फक्त व्यंगात्मक आहे.

न्यूयॉर्कमधील एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत, वीर दास म्हणाला की, 'मला वाटते की हशा हा उत्सवासारखा असतो आणि जेव्हा हशा आणि टाळ्या खोलीत गुंजतात तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो. मला वाटते की ज्या भारतीयाला विनोदाची भावना आहे, किंवा ज्याने माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिला आहे, त्याला खोलीत काय झाले हे माहित आहे. (Vir Das)

तो म्हणाला, 'कलाकार म्हणून तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात पण लाखो लोकांनी मला माझ्या या शोसाठी प्रेम दिले आहे.'
केनेडी सेंटरमधील या शोची ६ मिनीटांची व्हिडिओ क्लीप सोशल मिडीयावर फिरत आहे. ज्यामध्ये वीर दास यांनी, देशातील दोन विरोधाभासी चेहऱ्यांचा उल्लेख केला असून, दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून ते प्रदूषणापर्यंतच्या काही वादग्रस्त विषयांचा संदर्भही दिला आहे. (Vir Das)

यावरून ट्विटरवर अनेकांनी त्याच्या 'शब्दांचे' कौतुक करत त्याचा व्हिडिओ किंवा त्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. तर अनेकांनी वीर दासवर जोरदार टीकाही केल्याचे पहायला मिळते. परदेशात भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत भाजपच्या एका नेत्याने वीर दास यांच्यावर पोलिस केसही दाखल केली आहे.

हे ही पहा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT