Latest

उत्तर प्रदेशात शिवमंदिरात नमाज अदा केल्याने तणाव

मोहन कारंडे

बरेली; पीटीआय : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील केसरपूर येथे शिवमंदिरात नमाज अदा केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मौलानासह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

यातील महिलेचे नाव नझीरा (38) आणि तिच्या मुलीचे नाव सबिना (19) असे असून अन्य संशयिताचे नाव मौलाना चमन शाह मियाँ असे आहे. या घटनेमुळे केसरपूर गावात तणाव निर्माण झाला. शिवमंदिरात नमाज अदा करण्यात आल्याची बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. त्यानंतर गावकर्‍यांनी मंदिरात जाऊन याप्रकरणी संताप व्यक्त केला. मौलानाने भडकविल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT