Latest

BBC Documentary Controversy: आणखी एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :  केरळमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीबीसी डॉक्युमेंट्रीला ट्विट करत त्यांनी विरोध दर्शवला होता. अनिल अँटनी यांनी बुधवारी (दि.२५) सकाळी आपल्या ट्विटर हँडेलवरून ट्विट करत, काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिला आहे.

अनिल अँटनी यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी @incindia @INCKerala मधील माझ्या भूमिकेचा राजीनामा दिला आहे. भाषण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांकडून एक ट्विट मागे घेण्यासाठी सांगणे ही असहिष्णुता आहे, म्हणूनच मी ट्विट मागे घेण्यास नकार दिला. जे प्रेमाच्या वाटेचे समर्थन करत आहेत, त्याच्याच फेसबुक वॉलवरून अपशब्द आणि द्वेष पाहायला मिळत आहेत." असेही अनिल अँटनी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT