Latest

Congress president election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंग यांची माघार, मल्लिकार्जून खरगेंना पाठिंबा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Congress president election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंग यांनी माघार घेतली आहे. मल्लिकार्जून खरगे हे अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज भरणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. तत्पूर्वी खरगे हे अर्ज भरणार आहेत त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यात लढत होण्याचे आज दुपारपर्यंतचे चित्र आहे.

Congress president election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार यावर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शशी थरूर यांनी आपण निवडणूक लढण्यास उत्सूक आहोत हे अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते. त्यानंतर अशोक गेहलोत यांचेही नाव चर्चेत होते. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतच्या झालेल्या बैठकीनंतर अशोक गेहलोत यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

Congress president election : काँग्रेसचे आणखी एक वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यांनी नामांकन अर्ज देखिल घेतला होता. मात्र, आज दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. दिग्विजय सिंह म्हणाले, मल्लिकार्जून खरगे जर निवडणुकीसाठी अर्ज करणार आहेत हे माहित असते तर मी नामांकन अर्ज देखिल खरेदी केला नसता. दिग्विजय सिंह मल्लिकार्जून खरगे यांचा प्रस्ताव देणार आहेत.

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, मल्लिकार्जून खरगे हे आज दुपारी 12.30 मिनिटांनी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरणार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता शशी थरूर आणि मल्लिकार्जून खरगे या दोघांमध्ये मुकाबला असणार आहे. नामांकन अर्ज घेतल्यानंतर ट्विट करून दिग्विजय सिंग यांनी शशी थरून यांना देखिल शुभेच्छा दिल्या होत्या. "मी सहमत आहे @शशी थरूर आम्ही भारतातील सांप्रदायिक शक्तींशी लढत आहोत. दोघेही गांधीवादी नेहरूवादी विचारसरणीवर विश्वास ठेवतात आणि काहीही झाले तरी त्यांच्याशी अथकपणे लढतील. हार्दिक शुभेच्छा.", असे ट्विट त्यांनी केले होते.

मात्र, सिंग यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मल्लिकार्जून खरगे यांना आपला पाठिंबा दिला आहे. सोबतच अशोक गेहलोत यांनी देखिल मल्लिकार्जून खरगे यांचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT