Latest

Cylinder Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर दरवाढीचा भडका

दीपक दि. भांदिगरे

पेट्रोल, डिझेल नंतर आता ग्राहकांना सिलिंडर (Cylinder Price) दरवाढीचा फटका बसला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला. ही दरवाढ व्यावसायिक सिलिंडरवर झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही.

तेल कंपन्यांनी आज १ नोव्हेंबर रोजी सिलिंडर (Cylinder Price) दरात वाढ केली. यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा (कमर्शियल) दर २ हजार रुपयांवर पोहोचला आहे. याआधी १,७३३ रुपये दर होता. मुंबईत १,६८३ रुपयांना मिळणाऱ्या १९ किलोच्या सिलिंडरसाठी आता १,९५० रुपये मोजावे लागणार आहे. तर कोलकातात १९ किलोच्या सिलिंडरचा दर २,०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईत हा दर २,१३३ रुपयांवर गेला आहे.

घरगुती एलपीजी दरात वाढ नाही…

घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत १४.२ किलो वजनाचा विना अनुदानित गॅस सिलिंडर ८९९.५० रुपयांना मिळत आहे. ६ ऑक्टोबर रोजी हे दर वाढवले होते. याआधी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढवले होते.

घरगुती सिलिंडर १ हजारांवर जाण्याची शक्यता…

कच्च्या तेलाचे वाढते दर लक्षात घेता एलपीजी सिलिंडर १ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या घरगुती वापराचा सिलिंडर ९०० रुपयांच्या जवळ आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरातही वाढ…

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग सहाव्या दिवशी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ (Fuel price  ) करण्यात आली. इंधन दरात झालेली वाढ प्रत्येकी 35 पैशांची आहे. ताज्या दरवाढीनंतर इंधन दराने नवा विक्रमी स्तर गाठला गेला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कळंबा कारागृहात बंदीजनांनी भरवला दिवाळी मेळा | Kalamba Central Jail Kolhapur | कळंबा कारागृह

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT