Latest

5G Spectrum Auction : ५ जी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रियेला प्रारंभ; रिलायन्स जियो स्पर्धेत आघाडीवर

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात आज (दि.२६) सकाळी १० पासून ५ जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया  (5G Spectrum Auction) सुरु झाली आहे. देशातील चार कंपन्या या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. लिलाव प्रक्रिया स्पर्धेत रिलायन्स जियो आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय. कंपनीकडून दूरसंचार विभागाकडे १४ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तर या लिलाव प्रक्रियेत (5G Spectrum Auction) भारती एअरटेलकडून ५ हजार ५०० कोटी रुपये, अदाणी समूहाकडून १०० कोटी रुपये, वोडाफोन-आयडिया कडून २ हजार २०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करण्याचा कुठलाही मानस नसून ५ जीचा वापर समूहाचे कामकाज उत्तम करण्यासाठी करणार असल्याचे अदाणी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रक्रियेतून सरकार यंदा ७२ गिगाहर्टस स्पेक्ट्रम चा लिलाव करणार आहे. ४.३ लाख कोटी रुपये किमतीचे हे स्पेक्ट्रम आहेत. ६००, ७००, ८००, ९००, १८००, २१०० तसेच २३०० मेगा हर्ट्स 'लो' स्पेक्ट्रम आहेत. तर, ३,३०० मेगा हर्ट्स चे 'मिड' आणि २६ गीगा हर्ट्स चे उच्च स्पेक्ट्रमचा समावेश त्यात आहे.

५जी च्या वेगाची क्षमता १० जीबीपीएस पर्यंत आहे. हा वेग ४जी च्या १०० एमबीपीएस वेगाच्या तुलनेत १०० पटीने अधिक आहे. या लिलाव प्रक्रियेनंतर देशात ५ जी सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून दूरसंचार विभागाला ७० हजार ते १ लाख कोटी महसूल मिळण्याचा अंदाज आहे. २०२२ अखेर पर्यंत देशात ५ जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT