Latest

Colon Cancer : वृद्धांमध्ये आढळणारा आतड्याचा कर्करोग तरुणांमध्ये बळावला

अमृता चौगुले

मेसाच्युसेटस्; वृत्तसंस्था : तरुणांमध्ये कोलोन कॅन्सरचा (पोट-आतडे) धोका वेगाने वाढत आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या (एसीएस) संशोधकांच्या अंदाजानुसार यावर्षी अमेरिकेत कोलोन कॅन्सरचे 1.53 लाख रुग्ण असतील. (Colon Cancer)

यापैकी 13% लोकांचे वय 50 पेक्षा कमी असेल. 2020 मध्ये या वयोगटातील कॅन्सर रुग्ण 9% वाढले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आयकॉन स्कूल ऑफ मेडिसिनमधील ऑन्कोलॉजिकल सायन्सचे प्राध्यापक डॉ. स्टीव्हन म्हणाले, हा कॅन्सर पराकोटीला पोहोचल्यानंतर वृद्धांतील प्रमाण घटले होते. (Colon Cancer)

मात्र, तरुणांतील त्याचा कल धोकादायक आहे. 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांत हा कॅन्सर आक्रमक होत आहे. या अहवालानुसार भारतीय वंशाच्या लोकांत या कॅन्सरची जोखीम सर्वाधिक आहे. (Colon Cancer)

हा कॅन्सर मोठ्या आतड्यांत साधारण वाढीसह सुरू होतो व कालांतराने शरीराच्या दुसर्‍या भागात पसरू शकतो. पुरुष व महिलांत त्याची जोखीम समान असून वयोमानासह त्याचा धोका वाढत जातो. अमेरिकेत 30 ते 34 वर्षांच्या 1 लाख लोकांमध्ये केवळ 5 रुग्ण आढळतात.

50 ते 54 वर्षांच्या लोकांत 61 आणि 70 ते 74 वर्षे वयाच्या लोकांत 136 रुग्ण आढळतात. लठ्ठपणा किंवा काही खाद्यपदार्थ, पेय (रेड मीट, हॉट डॉग, मद्यपान) आणि बेशिस्त जीवनशैली यामुळे धोका वाढत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्कूल ऑफ पॉप्युलेशन अँड ग्लोबल हेल्थचे प्रमुख डॉ. नॅन्सी बॅक्सटर म्हणाल्या की, मलाशयातून रक्तस्राव, अ‍ॅनिमिया, पोट साफ न होणे, पोटदुखी ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT