Latest

पुढील चार दिवस महाराष्ट्राला भरणार हुडहुडी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. पुढील चार दिवस म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राला आणखी हुडहुडी भरणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत संपूर्ण राज्‍यातील किमान तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसनी घसरेल, असा अंदाज  हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे. ( cold wave hitting Maharashtra )

१९, २० जानेवारी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील तापमान थोडेसे वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतातील किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार आहे. २० जानेवारीपर्यंत गुजरातमध्ये किमान तापमान २ ते ३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तर भारतात बर्फवृष्टी

पश्चिम-मध्य इराणमध्ये चक्रीवादळ निर्माण होत आहेत, याचा प्रभाव वेस्टर्न डिस्टर्बन्सवर होत आहे. याचा परिणाम पश्चिम हिमालयातील काही भागांवर २० जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत तर उत्तर भारतातील काही राज्यांवर २३ ते २५ जानेवारीपर्यंत जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचा परिणाम या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी किंवा मध्यम स्‍वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT