Latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ( दि.१६) अभिनेता सलमान खान याची त्‍याच्‍या घरी जावून भेट घेतली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर रविवारी गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगमधील अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार व रोहित गोदराने स्वीकारली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ( दि.१६) अभिनेता सलमान खान याची त्‍याच्‍या घरी जावून भेट घेतली. यावेळी सलमान खानसह त्‍याचे वडील व बॉलिवूडमधील ज्येष्ठ लेखक सलीम खान उपस्‍थित होते. दरम्‍यान, सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या भुज येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना मंगळवारी १० दिवसांची म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सागर पालने सलमानच्या घरावर गोळी चालवल्याची कबुली दिली आहे. सागर हा हरियाणात काम करत असताना बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याची माहीती मिळत आहे. गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांनी रायगडमधून खरेदी केली होती.

वांद्रे पश्चिममधील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शोधण्यात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी रात्री उशिरा यश मिळाले. गुजरातमधील भुज येथून दोघांना अटक केली. मंगळवारी दोन्ही आरोपींना घेऊन मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज ठाकरेंनीही घेतली होती सलमान खानची भेट

वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ५ वेळा फायरिंग करून पळ काढला होता. या घटनेनंतर बॉलिवूडसह संपूर्ण देशरात सुरक्षाव्यवस्थेबाबत विषय चर्चेत आला. रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी राज ठाकरेंनी सलमान खानच्‍या घरी जावून भेट घेतली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT