Latest

Christmas Special Dish : नाताळ निमित्त करा चमचमीत खमंग खिमा पॅटीस

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Christmas Special Dish) ख्रिसमसमुळे सध्या खाऊ गल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी पाहायला मिळत आहे. त्यामुळे डिसेंबर या महिन्याची खवय्यांना आतुरता लागून राहिलेली असते. आज आम्ही तुम्हाला एका पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे घरबसल्या ही रेसिपी शिकणे खूप सोपे होणार आहे. चमचमीत खमंग खिमा पॅटीस हा तो पदार्थ आहे ज्याची रेसिपी या माहितीमधून मिळणार आहे.

साहित्य – Christmas Special Dish

मटण किंवा चिकन खिमा, सीकेपी मसाला किंवा गरम मसाला, कांदा, हिरवा वाटण, मीठ, हिंग, हळद, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, कॉनफ्लॉवर , ब्रेडचा चुरा

कृती –

खिमा पॅटीस करण्यासाठी दोन ते तीन वेळा खिमा स्वछ धुवून घेणे आणि पाणी पूर्ण काढून टाकल्यानंतर त्या खिम्याला हळद, हिंग, मीठ , हिरव वाटण मल (लसूण , कोथिंबीर आणि आलं टाकून वाटलेलं वाटण), सीकेपी मसाला किंवा गरम तिखट मसाला टाकून 15 मिनिटे ठेवावे त्यानंतर कढई घेऊन त्यात तेल टाकून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा परतून गुलाबी झाल्यानंतर लगेच मसाला लावून ठेवलेला खिमा कढईत शिजण्यासाठी ठेवावा. शिजवताना खिम्यात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी.

त्यानंतर उकडलेला बटाटा, मिक्सरमधून काढलेला पावाचा चुरा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर याचा घट्ट गोळा करावा , पाणी टाकू नये आवश्यकता वाटली तर हात ओला करून केवळ पाण्याचा हात लावावा. त्यानंतरया पिठाच्या वाट्या बनवून गार झालेला खिमा या वाटीत टाकावा आणि ही वाटी पूर्ण बंद करून तिला पॅटीसचा आकार द्यावा . त्यानंतर हे पॅटीस शिल्लक ठेवलेल्या ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून कढईत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. सॉस आणि पावा सोबत हे पॅटीस खाता येतात.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT