Latest

फराह खानकडून चंकी पांडेची बोलती बंद ! म्हणाली, आधी तू तुझ्या मुलीला सांभाळ

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. नुकतेच तिचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर बॉलिवूडची प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर असणारी फराह खानच्या ओव्हर अॅक्टिंगसाठी अवॉर्ड दिलं पाहिजे असे अनन्याच्या वडील चंकी पांडे म्हणाले. यावर फराहने त्यांना सडेतोड उत्तर दिले.

अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या इंन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यात फराह खान अनन्याच्या मेक-अप रुममध्ये धावत- पळत येते आणि अनन्याला म्हणते की, 'अनन्या तुला खाली-पीली चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं आहे. ' हे शब्द अनन्या ऐकताच ती खूपच उत्साहित होवून नाचू लागते. यानंतर फराह चंकी पांडे याचा 'I am joking…' हा डायलॉग बोलते. हे ऐकताच मात्र, अनन्याला खूपच वाईट वाटतं. या व्हिडिओत पहिल्यांदा अनन्याचा आनंद गगनात मावत नाही, तर दुसरीकडे ती निराश झालेली दाखवली आहे. हा मजेशीर व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्सनी कॉमेन्टस केल्या आहेत. याच दरम्यान चंकी पांडे यांनी व्हिडिओला कॉमेन्टस देताना 'फराह तुझ्या ओव्हर अॅक्टिंगसाठी तुला अवॉर्ड दिलं पाहिजे.' असे म्हटले आहे. यावर फराह त्याच्यांवर भडकत 'चंकी पांडे तू आधी स्वत:च्या मुलीला सांभाळ' असे म्हटले आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

अनन्या पांडेने 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पहिल्यादा पदार्पण केले आहे. त्यानंतर तिनं 'पती पत्नी और वो', 'खाली पीली' आणि 'गेहराईया' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. याशिवाय अनन्याचा आगामी 'Liger' हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस येत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT