Latest

Chocolate Day 2023 : तुम्हाला चॉकलेटचा इतिहास माहित आहे का?  

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लहान मूल असो वा प्रौढ, सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला आवडते. खूप कमी लोक असतील ज्यांना चॉकलेट खायला आवडत नाही. पण तुम्ही खात असलेल्या वेगवेगळ्या चॉकलेटचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊ या पहिलं चॉकलेट कसं तयार करण्यात आले.(Chocolate Day 2023)

Chocolate Day 2023 :  सुमारे ४००० वर्षे जुने

आपल्या बऱ्याच गोड क्षणांचा साक्षीदार हे चॉकलेट असतात. आज चॉकलेट दिन. दरवर्षी सात जुलै रोजी साजरा केला जातो. आपण चॉकलेट खातो पण कितीजणांना चॉकलेटचा इतिहास माहित आहे. तुम्हाला माहित आहे का? चॉकलेट सुमारे ४००० वर्षे जुने आहे. चॉकलेटचा इतिहास लॅटिन अमेरिकेपासून सुरू होतो. बर्‍याच वर्षांपूर्वी आजच्या आग्नेय मेक्सिकोमध्ये कोकोची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती. हे चॉकलेट कोको बीन्सपासून बनवले जाते. चॉकलेट बनविण्याचे श्रेय ओल्मेक्स संस्कृतीच्या लोकांना जातं. चॉकलेटच्या शोधाचे श्रेय मेक्सिकन लोकांनाही देता येईल.

अॅमेझॉन बेसिनच्या पावसाच्या जंगलात चॉकलेटची झाडे पाहायला मिळतात. याचा वापर पेय म्हणून सेवन केले जात असे. कोको बीन्सला कडू चव होती, म्हणून सुरुवातीला चॉकलेटचा वापर चलन म्हणून केला जात असे.

चॉकलेट गोड असण्याचे श्रेय युरोपला 

'चॉकलेट' या शब्दाबद्दल अनेकांची वेगवेगळी मते पाहायला मिळतात. काहींच्या मते हा शब्द मूळतः स्पॅनिश भाषेतील शब्द आहे.  चॉकलेट या शब्दाचा अर्थ अझ्टेक भाषेत आंबट किंवा कडू असा होतो. पूर्वी चॉकलेट खूप मजबूत असायचे, अमेरिकेतील लोक त्यात अनेक मसाले दळायचे आणि मिसळायचे. त्यामुळे ती चटपटीत असायची. पण ते गोड बनवण्याचे श्रेय युरोपला जाते, ज्यांनी मिरचीऐवजी साखर आणि दूध वापरले. तेव्हापासून चॉकलेटपासून त्याचे खाद्यपदार्थ बनवण्याचे श्रेय युरोपला जाते. चॉकलेट प्रत्येकाच्या आवडत्या आहेत आणि सर्व विशेष प्रसंगी देवाणघेवाण केली जाते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT