पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? सोनिया, राहुल गांधी यांची भेट घेतल्याची दिल्लीत चर्चा | Pankaja Munde | पुढारी

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? सोनिया, राहुल गांधी यांची भेट घेतल्याची दिल्लीत चर्चा | Pankaja Munde

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये (Pankaja Munde) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही रंगल्या आहेत. मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या (Congress) नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांची भेट घेत यासंदर्भात चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बीड जिल्ह्यातील परळी मतदार संघात २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. धनंजय हे पंकजा यांचे बंधू आहेत. शिंदे सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांचे बोट पकडत धनंजय मुंडे हे अलीकडेच राज्याचे मंत्री झाले आहेत. या घडामोडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार काय? याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Back to top button