Latest

Chitra Wagh vs Urfi Javed : ‘विरोध उर्फीला नाही, तर…’ चित्रा वाघ यांचा उर्फीवर पुन्हा एकदा हल्लाबोल (व्हिडिओ))

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील सोशल मीडिया वॉर थांबण्याची काही चिन्हे दिसत नाही. सोशल मीडियावर दोघींचे एकमेकींवर वार-पलटवार सुरू आहे. चित्रा वाघ यांनी नुकतेच एक ट्विट करून उर्फी जावेदवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. तसेच या वादात चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही ओढले आहे.चित्रा वाघ म्हणाल्या, "भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरत आहे, महिला आयोगानं स्वतः याची दखल का घेतली नाही, जाब का विचारला नाही ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो…कायदा कायद्याचं काम करणारंच; महिला आयोग काही करणार की नाही ?" असं ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेदवर (Chitra Wagh vs Urfi Javed) हल्लाबोल केला.

शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं

गेले काही दिवस भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि आपल्या चित्र-विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात वाद  सुरु आहे. सोशल मीडियावरुन दोघीही एकमेकींना आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हे सोशल वॉर गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. याची सुरुवात चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर केलेल्या कडक टीकेमुळे झाली. चित्रा वाघ यांनी " शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हीला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये." असं ट्विट केले होते. इथून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. आज पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला धारेवर धरले आहे. तसेच महिला आयोगावर देखील टिप्पणी करत या वादात ओढले आहे.

भर रस्त्यात अर्धनग्न

"भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीयं महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ?विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो…कायदा कायद्याचं काम करणारंच; महिला आयोग काही करणार की नाही ?" असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तर सामाजिक भान आणि स्वैराचाराला विरोध असा हॅशटॅग दिला आहे.

Chitra Wagh vs Urfi Javed : भाषा नको तर कृती हवी

पुढे त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की,"भाषा नको तर कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का ?" असं लिहित चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर हल्लाबोल केला आहे. हे ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र महिला आयोग, मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन, उपमुख्यंंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलिस, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला टॅग केले आहे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT