सन 2024 मध्ये सव्याज परतफेड करू ; आमदार प्रा.राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना टोला

सन 2024 मध्ये सव्याज परतफेड करू ; आमदार प्रा.राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना टोला
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : माझ्या वाढदिवसाचा सप्ताह का बसला आहे, याचे उत्तर मला काही सापडेना. मात्र, विरोधकांना कदाचित माहिती असावे. सन 2024 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्यांना सर्व सव्याज परतफेड करू, असा टोला आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठान व प्रवीण घुले पाटील मित्र मंडळातर्फे 'फु बाई फु' हा कॉमेडीचा महाधमाका, तसेच बहारदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार शिंदे व घुले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महेश तनपुरे, विलास निकत, विजय मोरे, महेंद्र धांडे, अमोल भगत, गणेश वाळुंजकर, माजिद पठाण, दादा सुरवसे, राम जहागीरदार राजू बागवान, संविधान दामोदरे, रिकी पाटील, सचिन पवार, मुल्ला काझी यांच्यासह मित्रमंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.

आमदार शिंदे म्हणाले, वाढदिवस एकच दिवस असतो. परंतु, कर्जत-जामखेड मतदारसंघात पुढील अनेक दिवस माझ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. अवघ्या अडीच वर्षांमध्ये हा बदल का आणि कसा झाला, याचे उत्तर मला सापडत नाही. मात्र, ज्यांना हे काय घडतं आहे आणि कशामुळे घडतं आहे, हे कदाचित लक्षात आले असावे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी प्रवीण घुले यांनी आमदार राम शिंदे हे पुढील काळात मंत्री व्हावेत, अशा सदिच्छा सर्वांच्या वतीने दिल्या. प्रास्ताविक सरपंच विलास निकत यांनी केले.

गोदड महाराजांचे आशीर्वाद

नऊ महिन्यांपूर्वी हुकूमशाही, दडपशाहीविरोधात गोदड महाराज मंदिराबाहेर उपोषण करून साकडे घातले होते. त्याची प्रचिती लगेच आली आणि मी आमदार झालो. राज्यात आमचे सरकार आले. आता काही नवीन जोडीदार सोबत येत आहेत. त्यांचे स्वागत करतो. पुढील काळात अनेक घटना घडणार आहेत. 2024 मध्ये विरोधकांना चितपट करू, असे शिंदे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news