Latest

Chinese Ghost Marriage : ‘या’ देशात होतात मृतांची लग्नं!

Arun Patil

बीजिंग : देश आणि जगभरात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. त्यापैकी काही विचित्र आहेत. पण, तुम्ही कधी मृत व्यक्तींचे लग्न असा प्रकार असतो हे ऐकलं आहे का? हो असं एक ठिकाण जिथं मृतांचीही लग्नं होतात आणि जिवंत माणसंच मृतांचे लग्न लावून देतात! अगदी थाटात हे लग्न होतं. आता मृत लोकांचे हे लग्न होतं तरी कसं आणि का, ते पाहुयात. मृतांचं लग्न लावण्याची अजब परंपरा आहे ती चीनमधील. गेल्या 3 हजार वर्षांपासून तिथं ही प्रथा सुरू आहे. (Chinese Ghost Marriage)

एरव्ही जसं माणसांचे लग्न होतं, तसंच या इथे मृत माणसांचेही लग्न होतं. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधला जातो. या लग्नात वय आणि कौटुंबिक पार्श्वभूमीही महत्त्वाची असते. यासाठी 'मॅच मेकर' म्हणून फेंगशुई मास्टर्सना ठेवलं जातं. जे लग्नासाठी योग्य कुटुंब शोधून देतात. इथे नवरीचं कुटुंब हुंडा घेतं. यात दागिने, नोकर आणि हवेलीचा समावेश असतो. ही संपूर्ण प्रक्रिया कागदावर श्रद्धांजलीच्या रूपात होते. लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीचे अंत्यसंस्कार विधी केले जातात आणि जेवण घातलं जातं. (Chinese Ghost Marriage)

नवरीची कबर खोदून तिच्या हाडांचा सापळा नवरदेवाच्या कबरीत टाकला जातो. या प्रथेमागील मान्यताही वेगवेगळ्या आहेत. जर कुणाचं जिवंतपणी लग्न झालं नाही तर मृत्यूनंतर त्यांनी लग्न करणं गरजेचं आहे. मृत्यूनंतरही मृतांनी आपलं आयुष्य सुरू ठेवावं अशी यामागील धारणा आहे. काहींच्या मते, जर मृतांची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्यांच्यावर दुर्भाग्य कोसळतं. तर काहींच्या मते, मृतांचे लग्न लावून दिल्याने मृतांना शांती मिळते. (Chinese Ghost Marriage)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT