Latest

China’s Defence Minister : परराष्ट्र मंत्री, फोर्स कमांडर नंतर आता चीनचे संरक्षण मंत्री सुद्धा बेपत्ता! पदावरून हवटवल्याची जगभर चर्चा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : China's Defence Minister : संपूर्ण जगभरात सध्या एकच चर्चा सुरू आहे चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू कुठे गायब आहेत. पहिले चीनचे परराष्ट्रमंत्री किंग गैंग नंतर फोर्स कमांडर आणि आता चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू सार्वजनिक बैठकांमधून 'आउट' आहेत. ली शांगफू हे गेल्या दोन आठवड्यापासून कोणत्याही सार्वजनिक बैठकांत दिसलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभर याची चर्चा होत आहे. चीनमधून सर्व महत्वाच्या पदांवरील व्यक्ती एकापाठोपाठ गायब झाल्याने शी जिनपिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. जपानमधील अमेरिकेचे राजदूत रेहम इमैनुअल यांनी याला 'एंड देयर वर नन' या कादंबरीची उपमा दिली आहे. ली यांना नजरकैद करण्यात आल्याच्या चर्चा ही सुरू आहेत.

संबंधित बातम्या :

China's Defence Minister : यावर्षीच बनले होते संरक्षण मंत्री

ली शांगफू हे यावर्षीच चीनचे संरक्षण मंत्री बनले होते. मार्च 2023 मध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले होते. असा दावा केला जात आहे की ली यांना बीजिंगमध्ये आयोजित तिसऱ्या तीन आफ्रिका चायना पीस अँड सिक्योरिटी फोरम मध्ये पाहिले होते. तिथे त्यांनी आपले मुख्य भाषण दिले होते. त्यानंतर ते गेल्या तीन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. पहिले ते व्हिएतनाम दौऱ्यात दिसले नाहीत नंतर सिंगापूरच्या नौसेना अधिकाऱ्यांच्या नियोजित बैठकीतही ते अनुपस्थित होते. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिएतनामी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, "आरोग्य स्थिती" मुळे ली यांनी गेल्या आठवड्यात अचानक एक बैठक रद्द केली.

China's Defence Minister : शांगफू यांच्यावर होते भ्रष्टाचाराचे आरोप?

अमर उजालाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ली शांगफू अशा प्रकारे बेपत्ता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या हार्डवेअर खरेदीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच चीनचे संरक्षण मंत्री बेपत्ता झाले आहेत. जुलैमध्ये हा तपास सुरू करण्यात आला होता, हे विशेष. तथापि, चिनी लष्कराचे म्हणणे आहे की ते ऑक्टोबर 2017 पासून या मुद्द्यांचा तपास करत आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालात ली हे सप्टेंबर 2017 ते 2022 पर्यंत उपकरण विभागात कार्यरत होते. मात्र, त्याच्यावर कोणतेही आरोप नाहीत.

China's Defence Minister : ली शांगफू यांना पदावरून हटवले?

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्ताच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे की, तीन अमेरिकन अधिकारी आणि गुप्तचर विभागाशी संबंधित दोन अन्य अधिकार्‍यांनी सांगितले की, दोन आठवड्यांपासून न दिसणारे ली शांगफू यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्यात आल्याच्या निष्कर्षावर अमेरिका पोहोचली आहे. ली शांगफू यांच्या विरोधात हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे, जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या लष्कर पीएलए रॉकेट फोर्सच्या दोन सर्वोच्च जनरल्सना हटवले आहे. हे दोन्ही जनरल चीनच्या वेगाने वाढणाऱ्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवायचे.

China's Defence Minister : परराष्ट्रमंत्री किंग गैंग यांचीही अशीच उचलबांगडी

यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री किंग गैंग यांचीही अशीच उचलबांगडी करण्यात आली होती. विशेष म्हणजे किंग हे जिनपींग यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT