Latest

‘ड्रॅगन’ची पुन्‍हा सटकली! चीनच्‍या १०३ लढाऊ विमानांचे तैवानच्या दिशेने उड्डाण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील २४ तासांच्‍या कालावधीत चीनच्‍या लष्‍कराने तैवानच्‍या दिशेने एकूण १०३ लढाऊ विमाने पाठवली आहेत. एक दिवसात तैनातच्‍या दिशेने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने उड्डाण करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे, असे तैवानच्‍या संरक्षण मंत्रालयाने म्‍हटले आहे.

संबंधित बातम्‍या :

तैवान हे चीनच्‍या अग्‍नेय समुद्र किनार्‍याजवळ असणारे बेट आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि त्यांनीच निवडून दिलेल्या नेत्यांचं सरकार आहे. तैवान हा आमचाच प्रांत आहे. एक दिवशी तो चीनचा भाग होणार आहे, असा दावा चीन करत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने टिव्टच्‍या माध्‍यमातून खुलासा केला आहे की, चीनच्‍या ४० लढाऊ विमानांनी मुख्य भूप्रदेश चीन आणि बेट यांच्यातील प्रतिकात्मक बिंदू ओलांडला आहे. तर मागील २४ तासांमध्‍ये ९ नौदल जहाजांची सीमेजवळ नोंद झाला आहे.
( China-Taiwan dispute )

China-Taiwan dispute : 'हा तर छळ'…

तैवानच्‍या मंत्रालयाने चीनच्या लष्करी कृतींना "छळ" असे संबोधले आहे. तसेच सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचाही इशारा दिला. बीजिंग अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा विघटनकारी लष्करी कारवाया तत्‍काळ थांबवाव्‍यात, असे आवाहन केले आहे.

चीनकडून धमक्‍यांचे सत्र सुरुच

मागील काही महिने चीनने तैवानला वारंवार धमक्‍या देणे सुरुच ठेवले आहे. अलीकडेच युद्धाभ्यासात चीनने अप्रत्यक्षपणे तैवानला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न केला. दारूगोळा वाहून नेणाऱ्या विमानांनी तैवानजवळ हल्ला करण्याचा सराव केला होता. या सरावात त्याची शेडोंग विमानवाहू नौकाही सहभागी झाली होती.

चीनने अलीकडच्या काळात स्वशासित बेटावर आपला राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे. आम्‍हाला शांतता हवी आहे; परंतु हल्ला झाल्यास आम्‍ही स्वतःचे रक्षण करणार, असे तैवान सरकारने यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे.मागील वर्षी तैवानमध्‍ये अमेरिकेच्‍या प्रतिनिधीगृहाच्‍या सभापती नॅन्‍सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव वाढला. गेल्‍या २५ वर्षांमध्‍ये अमेरिकेतील उच्‍चपदस्‍थ नेत्‍याचा हा पहिलाचा तैवान दौरा होता. चीनने या दौर्‍याचा निषेध करत हा दौरा द्वेषपूर्ण असल्‍याचे म्‍हटले होते. तैवान आणि चीन यांचे एकीकरण होणार असल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यावेळी चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांनी केला होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT