Latest

Nuclear Weapons : अण्वस्त्रनिर्मितीत भारतापेक्षा चीन, पकिस्तानचा वेग अधिक

अमृता चौगुले

स्टॉकहोम; वृत्तसंस्था : भारताच्या तुलनेत चीन आणि पाकिस्तानची अण्वस्त्रनिर्मितीतील आघाडी कायम असून, गेल्या काही वर्षांत या दोन्ही देशांनी आपापल्या भात्यातील अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढवली आहे. स्वीडनमधील एसआयपीआरआय या संस्थेने यासंदर्भातील आपला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. (Nuclear Weapons)

अहवालानुसार गेल्या काही वर्षांत चीनने आपल्या शस्त्र भांडारात 60 नवी अण्वस्त्रे समाविष्ट केली असून, पाकिस्तानच्या भात्यात 5 नव्या अण्वस्त्रांची भर पडलेली आहे. भारताने या कालावधीत 4 नवीन अण्वस्त्रे विकसित केली आहेत. (Nuclear Weapons)

केवळ आशियाच नव्हे, तर अण्वस्त्रांचा साठा संपूर्ण जगात सतत वाढत चाललेला असल्याने सध्या मानवता आपल्या सर्वात धोकादायक टप्प्यातून जात असल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. (Nuclear Weapons)

आकडे बोलतात…

  • 12,512 अण्वस्त्रे सध्या जगभरात आहेत.
  • 3,844 अण्वस्त्रे क्षेपणास्त्रे, युद्धविमानांत बसवली आहेत.
  • 9,576 अण्वस्त्रेे कुठल्याही क्षणी विनाशासाठी सज्ज
  • 86 अण्वस्त्रेे नव्या वर्षात विकसित झालेली आहेत.
  • 90% अण्वस्त्रेे सध्याही रशिया आणि अमेरिकेकडेच आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT