Latest

बारामतीत मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा हजर..

Laxman Dhenge

बारामती : बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार आज मेळाव्याला ताफा हजर झाला. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून छापण्यात आलेल्या आधीच निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांच नाव नसल्याने शरद पवार या कार्यक्रमास उपस्थित राहणार का अशी चर्चा रंगली होती.

मात्र सरकारकडून ताबडतोब दुसरी निमंत्रण पत्रिका छापून त्यामध्ये शरद पवारांच नाव टाकण्यात आलं. यामुळे आता शरद पवार कार्यक्रमास जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत होणार असल्याचे पाहता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर होत असलेल्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT