Latest

Himachal Pradesh Election Result : हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर सलग सहाव्यांदा विजयी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Election Result) मोठा विजय मिळवला. जयराम ठाकूर यांनी सलग सहाव्यांदा त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या सेराजमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी २० हजारांच्या मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election Result )मतमोजणी आज सकाळी ८ पासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, काँग्रेसने ६८ पैकी ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच सोबत गुजरातचे देखील निकाल आजच जाहीर होणार आहे. या दोन्ही विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण भारताचे लक्ष आहे.

निकालांचे अपडेट सुरू झाल्या पासूनच हिमाचल प्रदेशमध्ये भाजप-काँग्रेस दोन्हींमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या कधी मी कधी तू…अशी परिस्थिती आहे. जसजसे निकालांचे कल हाती येत आहे. तसतसे कधी भाजप आघाडी घेत आहे .तर कधी काँग्रेस आघाडी घेत आहे. तर कधी दोन्ही पक्ष बरोबरीने चालत आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT