Latest

पावासाचा जोर वाढणार; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :  पुढील चार ते पाच दिवस राज्यात विशेषतः कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते असेही, सांगितले आहे. त्यामुळे या संदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT