Latest

Chhattisgarh : डीआरजीच्या जवानांकडून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठा जप्त

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chhattisgarh : छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यात अंतागढात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज पहाटे चकमक झाली. यावेळी डीआरजीच्या जवानांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. पहाटे 4 च्या दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

Chhattisgarh : हा भागात मोठे घनदाट जंगल आहे. आणि डीआरजीचे जवान आपल्यावर भारी पडत आहेत हे पाहून अन्य नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिली. त्यांनी सांगतिले की, सिकसोद ठाण्याअंतर्गत येणा-या कदमे गावाजवळ जिला रिजर्व गार्ड सोबत ही चकमक झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना मोठे यश मिळाले. तसेच कारवाईत मोठ्या प्रमाणात हत्यारे, गोळा-बारूद आणि नक्षलशी संबंधित गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पळून गेलेल्या नक्षल्यांचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT