फिलिपाईन्समध्ये महापूर, भूस्खलनाचे 72 बळी | पुढारी

फिलिपाईन्समध्ये महापूर, भूस्खलनाचे 72 बळी

मनिला : फिलिपाईन्समध्ये ‘नाल्गा’ या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पाऊस, महापूर आणि भूस्खलनामुळे 72 जणांचा बळी गेला आहे. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागास वादळाचा मोठा फटका बसला. अद्याप सुमारे 60 लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूस्खलनामुळे खडक, झाडे व मातीच्या ढिगार्‍यात ते गाडले गेल्याची भीती अधिकार्‍यांनी व्यक्त केली. गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत मागुइंदानाओ प्रांतातील तीन शहरांमध्ये पुरात किमान 42 जण बुडाले. यापैकी काही जण चिखल-दलदलीत सापडले, असे मंत्री नागुइब सिनारिम्बो यांनी सांगितले. हे वादळ शनिवारी पहाटे पूर्व भागात कॅमेरिन्स सूर प्रांतात पोहोचले.

Back to top button