छत्रपती संभाजीनगर ; पुढारी वृत्तसेवा सिल्लोडच्या सह दुय्यम निबंधक छगन पाटील याने ८६ दस्तांमध्ये नोदणी नियमांचा भंग करुन मुद्रांक शुल्काची आकारणी न करता शासनाचा ४८ लाखांचा महसूल बुडवल्याप्रकरणी २९ फेब्रुवारीला शासन आदेशानुसार निलंबित करण्यात आले. यानंतर चोवीस तासातच स्टॅम्प वेंडर भीमराव खरात याच्या मदतीने पाच हजाराची लाच स्वीकारताना त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने त्याच्या हिमायत बाग परिसरातील तीन रूम असलेल्या घरावर छापा मारला. तेव्हा त्याच्या घरात पथकाला एक कोटी ३६ लाख ७७ हजारांची रोकड हाती लागली. २८ तोळ्यांचे दागिने सध्या जप्त करण्यात आले आहेत. या शिवाय बँकेच्या एफडी, प्रॉपर्टीची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी शनिवारी दिली. रात्री उशिरापर्यंत हिमायत बाग परिसरात कारवाई सुरू होती.
हेही वाचा :