Latest

केमिकल इंजिनिअर ड्रग तस्कर ‘जर्मन’ निघाला ललितचा नातेवाईकच !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील ससून रुग्णालयातून चालणारे रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर ड्रग्ज रॅकेट ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ललित हा ससून रुग्णालयात चोरून वापरणारा मोबाईल पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये ड्रग तस्कराचा नंबर 'जर्मन' नावाने सेव्ह होता. तो जर्मन नावाचा नंबर हा दुसर्‍या तिसर्‍या कोणाचा नसून तो भूषण पाटील याचाच असल्याचे आता तपासात समोर आले आहे. ललितच्या फोनवर 'जर्मन' नावाने पाच फोन आले होते. नाशिक येथील शिंदे गावालगतचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला.

संबंधित बातम्या :

या वेळी 300 कोटींचे ड्रग जप्त केले आहे. तो कारखाना भूषण पाटील याचाच असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर असून, त्या शिक्षणाचा उपयोग त्याने विधायक कामासाठी न करता ड्रग तस्करीच्या काळ्या धंद्यात एंट्री केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याचा केमिकल इंजिनिअर ते ड्रग तस्कर हा प्रवास पोलिस करीत असलेल्या तपासात उघड होत आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी 2 कोटींचे ड्रग जप्त केले होते. ललित हा भाऊ भूषणच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ड्रग पकडले त्या दिवशी भूषण पुण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. केमिकल सप्लायच्या नावाखाली भूषण ड्रग तस्करी करीत होता. चाकण येथील गुन्ह्यात ललित पाटील याला अटक झाल्यानंतर वारंवार जामिनासाठी अर्ज करण्यात येत होता. परंतु, त्याला आतापर्यंत जामीन मिळू शकला नाही. असे असतानाही दुसर्‍या बाजूला भूषण हा ड्रग तस्करीच्या धंद्यात अ‍ॅक्टिव्ह असल्याचे आता समोर आले आहे.

SCROLL FOR NEXT